आमच्या मागील लेखात, आम्ही आपल्या व्यवसायासाठी SEO च्या महत्वावर चर्चा केली. या लेखात, आम्ही On-Page SEO काय असते आणि ते कसे कार्य करते यावर चर्चा करू.

प्रत्येक Search Engine कडे स्वतःचे अल्गोरिदम आहेत जे तुमच्या प्रश्नांना सगळ्यात समर्पक माहिती मिळवून देण्यात मदत करतात. आपल्या वेबसाइटच्या Web pages ची माहिती समजण्यासाठी हे अल्गोरिदम एक विशिष्ट पद्धत वापरते. यासाठी, वेबसाइटच्या कोडिंगमध्ये काही मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे आवश्यक आहे. तुम्ही जर योग्य नियमांचे पालन करत असल्यास, Search Engines ना तुमच्या Web Pages ची माहिती समजून घेणे सोपे होते. तुम्ही जर कोडिंग जटिल केली असेल तर एसइओ साठी अधिक वेळ लागेल किंवा आपल्याला Search Engines मध्ये इच्छित कीवर्डसाठी कधीही चांगली श्रेणी मिळणार नाही.

ऑन-पेज एसईओसाठी कोडिंग मार्गदर्शक तत्वे काय आहेत:
  1. प्रत्येक Web page ला एक अद्वितीय शीर्षक असावे आणि ते <title> टॅगमध्ये परिभाषित केले जावे
  2. प्रत्येक पृष्ठाचे वर्णन असावे आणि ते meta-description टॅगमध्ये परिभाषित केले जावे
  3. शीर्षकांसाठी केवळ शीर्षक टॅग वापरावे
  4. प्रत्येक पृष्ठात केवळ एक h1 टॅग असणे आवश्यक आहे
  5. <title> आणि h1 टॅगमध्ये प्रासंगिकता असणे आवश्यक आहे
  6. प्रत्येक फोटो/इमेज चा Alt टॅग परिभाषित केली पाहिजे
  7. परिच्छेदांसाठी <p> टॅग्ज वापरले पाहिजेत
  8. नेव्हीगेशन मेनू <nav> टॅगमध्ये ठेवली पाहिजे

आपण योग्यरित्या लक्षात घेतल्यास, प्रत्येक HTML टॅगचा एक निश्चित अर्थ असतो आणि त्या टॅगच्या अर्थानुसार आपण आपल्या Web Page ची माहिती परिभाषित करणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त ऑन-पेज एसईओचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे कीवर्ड फ्रिक्वेंसी.

Keyword Frequency बद्दल आम्ही वेगळ्या लेखात चर्चा करू.

On-page SEO बद्दल तुम्हाला काहीही शंका असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये आपली शंका विचारा. आम्ही नक्की तुम्हाला मदत करू