तुम्ही जर तुमच्या व्यवसायासाठी संकेतस्थळ बनवून घेतले असेल, तर तुम्ही Search Engine Optimization(SEO) बद्दल ऐकले असेल. SEO मुळे Search Engine संकेतस्थळांमध्ये तुमच्या संकेतस्थळाची रँकिंग वाढण्यास मदत होते. यामुळे तुमचा व्यवसाय तुमच्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. .

इंटरनेट वर बरेच Search Engine उपलब्ध आहेत. Google.com , Bing.com, Yahoo.com हे सगळ्यात जास्त वापरले जाणारे Search Engines आहेत. 90% ग्राहक कोणत्याही संकेतस्थळावर जाण्यापूर्वी Google वर त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात..

प्रत्येक Search Engine वेगळ्या प्रकारचे अल्गोरिदम वापरत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती Search Engine वर काही शोधण्याचा प्रयत्न करते तेव्हा Search Engine त्यांच्या अल्गोरिदम चा वापर करून जास्तीत जास्त संबंधित वेबपेजेस ची माहिती आणून देते. यासाठी, Search Engine सतत निश्चित कालावधीने प्रत्येक संकेतस्थळावर असलेल्या वेबपेजेस चे निरीक्षण करत असते आणि त्यावर दिलेली माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. हे Search Engines ना शोध निकालांमध्ये संबंधित नोंदी प्रदान करण्यास मदत करते..

Search Engine मध्ये तुमच्या संकेतस्थळाला सर्वोच्च Rank असणे का आवश्यक आहे? कारण तुमचे बहुतेक ग्राहक बऱ्याचदा Search Engines वर तुमच्या व्यवसायाशी संबंधित त्यांचे प्रश्न विचारत असतात. जर आपल्या वेबसाइटची लिंक त्यांना Search Engine Results च्या पहिल्या यादीत दिसली तर ते त्या लिंक वर क्लिक करण्याची शक्यता वाढते. यामुळे अधिक लोक आपल्या वेबसाइटला भेट देतात, नवीन ग्राहक मिळवणे किंवा व्यवसाय वाढण्याची शक्यता वाढते.

Search Engine मधून येणाऱ्या visitors ना Organic Traffic म्हणतात कारण ते विनामूल्य असते. यासाठी आपल्याला Search Engines ना पैसे द्यावे लागत नाहीत..

मग पुढील प्रश्न म्हणजे Search Engine मध्ये आपल्या संकेतस्थळाचा Rank कसा सुधारता येतो ?

यासाठी, आपल्याला आपल्या संकेतस्थळाचे Search Engine Optimization करावे लागते. Search Engine Optimization आपल्या संकेतस्थळावरील माहिती समजून घेण्यासाठी Search Engines ना मदत करते. इंटरनेटवर लाखो वेबपेजेस उपलब्ध असल्यामुळे, SEO चे परिणाम पाहण्यासाठी वेळ लागतो..

एसईओ मध्ये वापरल्या जाणारे दोन समान महत्वाचे तंत्रे आहेत:
  1. ऑन-पेज एसइओ
  2. ऑफ पेज एसईओ

आम्ही आमच्या पुढील ब्लॉगमध्ये या दोन तंत्रज्ञानावर चर्चा करू..

जर आपण संकेतस्थळ बनवून घेतले असेल आणि संकेतस्थळाचे एसइओ केले नसेल तर आपण आजच्या जगात एक खूप मोठी चूक करत आहात..

म्हणून, जर आपण आपल्या संकेतस्थळावर विनामूल्य आणि संबंधित visitors आणू इच्छित असाल जे आपल्या व्यवसायासाठी संभाव्यपणे ग्राहक किंवा विक्री तयार करू शकते, तर आपण आजच आपल्या वेबसाइटची एसइओ सुरू करणे आवश्यक आहे.