Business Idea हि एक संकल्पना असते ज्याच्या द्वारे आपल्याला आर्थिक नफ्याची अपेक्षा असते. साधारणपणे, आपण नवनवीन उत्पादने विकसित करतो किंवा निरनिरळ्या सेवा प्रदान करून आर्थिक नफा मिळवत असतो.

आपली उत्पादने व सेवा विकून आम्ही सहज पैसे कमवू शकतो. परंतु, त्या व्यवसायासाठी फायदेशीर असणे आवश्यक आहे. Business Idea हा प्रत्येक व्यवसायाचा आधार असतो. आपण काय विकणार आहोत, कोणाला विकणार आहोत, कधी विकणार आहोत, आणि त्यातून आपल्याला कसा नफा मिळू शकतो अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं Business Idea देत असते.

एक चांगली Business Idea , जर वास्तविकतेत रूपांतरित केली तर आपल्या कंपनीला चांगला नफा मिळवून देऊ शकते.

चांगल्या व्यवसायाच्या कल्पनांची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये:
  1. नाविन्यपूर्ण
  2. अद्वितीय
  3. समस्या सोडवणारी
  4. फायदेशीर

पूर्वी टॅक्सी किंवा ऑटो रिक्षा बुक करताना खूप त्रास व्हायचा. तसेच, जर आपल्याला एखादी खाजगी गाडी बुक करायची असेल तर कार उपलब्ध आहे का ते तपासण्यासाठी आपल्याला अनेक एजंट्स आणि तत्सम सेवा पुरवठादारांना फोन करावा लागायचा. मग आपण ड्रायव्हर्सशी वाटाघाटी करायचो आणि त्यानंतर आपल्याला बुकिंग करता येत होतं. तसेच, तेथे अनेक सुरक्षेच्या समस्या होत्या.

आता, ओला आणि उबेरमुळे आपण आपल्या फोनचा वापर करुन कॅब बुक करू शकतो. आपल्याला किती पैसे द्यावे लागतील ते कळते, कॅब आपल्या ठिकाणी कधी पर्यंत पोहोचेल याची माहिती मिळते, आपल्या कुटुंबियांना कॅब ची लाईव्ह लोकेशन पाठवू शकतो आणि बरेच इतर फायदे आहेत.

Business Model आणि Business Idea या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

लोकांना त्यांच्या फ़ोन मधून कॅब बुक करायचा पर्याय देणे याला Business Idea म्हणता येईल . परंतु, त्यापासून नफा कसा मिळवावा याला Business Model म्हणतात.

आमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये Business Model ची वैद्यता तपासणे का गरजेचे आहे यावर चर्चा करू

.